Monday 26 September 2011

आय.पी. अ‍ॅड्रेस

IP Address म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस व तो माहितीच्या महाजालाशी जोडलेल्या संगणक सिस्टिमशी निगडित असतो. संगणक सिस्टिमसाठी तयार केलेला तो एक ओळखीचा क्रमांक असतो. कार्यालयातील संगणकाचे हार्डवेअर अभियंते नेटवर्किंगसाठी या अ‍ॅड्रेसचा वापर करतात. हा क्रमांक असतो व तो इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या प्रत्येक संगणकाच्या स्थळाची माहिती देतो. टेलिफोन किंवा सेलफोनच्या क्रमांकावरून तो कुठल्या ठिकाणचा आहे हे समजतो, त्याचप्रमाणे आयपी अ‍ॅड्रेस हा त्या त्या संगणकाचा ठावठिकाणा सांगू शकतो.

आयपी अ‍ॅड्रेस तीन क्लासमध्ये विभागलेला असतो. क्लास ‘ए’ मध्ये १.६ कोटी नेटवर्क समूह असतात व त्या प्रत्येक समूहाला १२६ नेटवर्क जोडलेले असतात. क्लास ‘बी’ मध्ये ६-६५ हजार नेटवर्क समूह असतात व प्रत्येकी १६ हजार नेटवर्कने बांधलेले असतात. तर ‘सी’ क्लासमध्ये केवळ २५६ नेटवर्क समूह असतात व त्यात प्रत्येकी २० लक्ष नेटवर्क समाविष्ट असतात. जरी ‘सी’ क्लास हा लहान नेटवर्किंग समूहासाठी असे म्हटले तरी प्रत्यक्षात जवळजवळ सर्वच ठिकाणी या प्रकारातली प्रणाली वापरली जाते.

आयपी अ‍ॅड्रेसची सध्या वापरात असलेली प्रणाली ही चौथ्या आवृत्तीत असून तिच्या जागांचे जगभरातले वाटप इंटरनेट असाईन्ड नंबर्स अ‍ॅथॉरिटी (IANA) ही संस्था करत असते. त्यासाठी त्या संस्थेला पाच विभागीय शाखा (रिजनल इंटरनेट रजिस्ट्रिज) साहाय्य करीत असतात. आयपी अ‍ॅड्रेसेस हे स्टॅटिक व डायनॅमिक असे दोन प्रकारचे असतात. संगणक व्यवस्थापनाने नेमून दिलेला स्टॅटिक क्रमांक हा एखाद्या वेबसाईटचे नाव आणि जागा म्हणजे डोमेन नेममध्ये असतो व तो बदलत नाही.

आपल्या संगणकावर जर इंटरनेटची सुविधा असेल तर www.what is my ip address.com या वेबसाईटवर आपण आपला संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस पाहू शकतो. या वेबसाईटवर आपण कुठल्या शहरामध्ये इंटरनेट वापरत आहोत हे दाखवले जाते.

पोलिसांना सायबर सेलवरून गुन्हेगारांचा थांगपत्ता लावण्यासाठी आयपी अ‍ॅड्रेस उपयोगी पडतो. अर्थात सायबर गुन्हेगारदेखील कधी चोरावर मोर होऊन आणि दुसºया संगणकाच्या आयपी अ‍ॅड्रेस वापरून पोलिसांना चकवतात.

No comments:

Post a Comment