सुपर कॉम्प्युटर हे सर्वात जास्त वेगाने काम करणारे आणि सर्वात महागडे मशीन आहे. त्याची प्रक्रिया करण्याची क्षमता इतर संगणकांपेक्षा जास्त असते. तसेच यामध्ये एकावेळेस अनेक प्रक्रिया करण्याची क्षमताही असते. सुपर-कॉम्प्युटर बनविण्यासाठी शेकडो मायक्रोप्रोसेसर एकापाठोपाठ एक जोडावे लागतात. या संगणकाचा वापर हवामानाचा अंदाज दर्शविण्यासाठी, जैववैद्यक शास्त्रातील संशोधन, विमानाची रचना बनविणे, शास्त्र, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात होतो. सुपर-कॉम्प्युटरची उदाहरणे म्हणजे CRAY YMP, CRAYZ, NEC SX-3 CRAY XMP आणि भारतातील परम होय. |
No comments:
Post a Comment