Monday 26 September 2011

चॅटींग

प्रस्तावना | 'चॅट' म्हणजे काय? | चॅटची पार्श्वभूमी | चॅटरूमचे प्रकार | इंन्स्टंट मेसेंजिंग (Instant Messaging) | मेसेंजर म्हणजे काय ? | याहू मेसेंजर काम कसे करतो? | याहू आयडी | निकनेम | चॅटींग कसे करावे?


    
चॅटींगची सुविधा वापरून तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकता. खर तर चॅटींग हा एक सुसंवाद साधण्याचा अत्यंत परिणामकारक मार्ग आहे. कारण फोनवरून जगातील लोकांशी संवाद साधणे खुपच महागडे असते.
'चॅट' म्हणजे तुमच्या सर्वसाधारण ई-मेल प्रमाणेच असते. येथे फरक एवढाच की चॅटच्या मार्फत साधलेल्या संवादामध्ये संदेशाची देवाणघेवाण तात्काळ होते पण ई-मेल हे माध्यम वापरले तर संदेश देवाण घेवाण हळू होते. चॅटचा वापर करून तुम्ही संदेश टाईप करता आणि बटण दाबता, आणि एका सेकंदात तो संदेश जगातील कोणत्याही व्यक्तीला पाहता येतो.
इंटरनेटच्या युगामध्ये चॅटींग हा खुप मोठया प्रमाणात वाढत असलेला इंटरनेटमधील विभाग आहे. याचे कारण म्हणजे तरूण पिढीला यात खुप गंमत वाटते आणि नवनविन मित्रांशी तात्काळ संपर्क साधता येतो.
चॅटींगमुळे तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा मित्रांच्या समुहाशी सतत संपर्कात राहून संदेशाची देवाण घेवाण करू शकता. चॅटींगच्या माध्यमातून आपण जगातील अनेक लोकांना आपले मित्र बनवू शकता. तुम्ही टाईप केलेला संदेश खुप वेगाने तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचत असल्याने हा सुसंवाद फोनवर बोलण्याप्रमाणेच असतो.
चॅटींगमध्ये जेव्हा तुम्ही संदेश टाईप करत असता तेव्हा त्या चॅटरूममध्ये दुसऱ्या व्यक्तीने पाठविलेले संदेश आपण पाहू शकता. एकाच वेळेस तुम्ही अनेक मित्रांशी चॅटींग करू शकता. येथे विविध प्रकारच्या चॅटरूम उपलब्ध असतात. 'ओपन चॅट' जेथे एखाद्या विशिष्ठ विषयाला अनुसरून चॅटींग केले जाते. उदाहरणार्थ टीव्ही शो किंवा खेळ इत्यादी. काही चॅट रूममध्ये एखाद्या विषयावर चर्चा चालू असतांना अनेक लोकांमधून एक व्यक्ती त्या चर्चेचे नेतृत्व करतो.साधारणत: चॅटींगमधील संदेश हा अक्षरांच्या माध्यमात असतो. परंतू कधी कधी तो आवाजाच्या स्वरूपातही असू शकतो.
चॅटरूमचे दोन प्रकार असतात.
A) सार्वजनिक (Public)
B) खाजगी (Private)
सार्वजनिक चॅटरूममध्ये तुम्ही ज्या व्यक्तींच्या समुहाशी चॅट करत असता त्या शक्यतो आपल्या परिचयाच्या असतात किंवा ज्या संदेशाची देवाणघेवाण आपण करू इच्छितो तो संदेश खाजगी स्वरूपाचा नसतो. परंतू जेव्हा कमी लोक विशिष्ठ मुद्यावर चर्चा करत असतात तेव्हा खाजगी चॅटरूमचा वापर केला जातो.
इंन्स्टंट मेसेंजिंग हे चॅट करण्याचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. वर पाहिल्याप्रमाणे चॅटरूमचा वापर करताना व्यक्तीच्या समुहाशी आवश्यकता असते. परंतू 'इंन्स्टंट मेसेंजिंगच्या' माध्यमातून एक व्यक्ती एका व्यक्तीबररोबर चॅट करू शकतो. बरेचदा जेव्हा आपण आपल्या खास मित्राबरोबर चॅटींग करत असतो तेव्हा 'इन्स्टंट मेसेंजिंग' वापरण्यात येते, जर तुम्हाला कोणी या चॅटींगमध्ये त्रास देत असेल तर Ignore ही सुविधा वापरून त्या व्यक्तीकडे तुम्ही दुर्लख करू शकता.
मेसेंजर हे असे एक सॉफ्टवेअर आहे ज्यामार्फत तुम्ही दूरवर असणाऱ्या मित्राशी किंवा मित्रांच्या गटाशी संपर्क साधू शकता. बऱ्याच वर्षांपासून 'याहू मेसेंजर ' 'एमएसएन मेसेंजर' हे सॉफ्टवेअर चॅटींगसाठी प्रसिध्द आहेत. 'याहू मेसेंजर ' काही वर्षांपूर्वी फक्त चॅटींगसाठी मित्रांची यादी बनविणारा साधा प्रोग्रॅम होता. पण येत्या काही वर्षात त्याच्या सुविधांमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. सध्याच्या 'याहू मेसेंजर मध्ये' 'याहू चॅटरूम', 'वेब कॅमेरा', विविध प्रकारच्या हास्यांची चित्रे इत्यादी गोष्टी पहावयास मिळतात.
'याहू मेसेंजर ' संपुर्णत: 'याहू आयडी' या संकल्पनेवर काम करतो. आणि हिच संकल्पना 'याहू ईमेल', 'याहू प्रोफाईल' 'याहू चॅट' या सर्वांसाठीसुध्दा सारखीच असते. परंतू 'याहू मेसेंजर ' 5.5 पासून 'निकनेम' ही संकल्पनासुध्दा वापरता येते. प्रत्येक व्यक्ती आपल्या पसंतीचे नाव निकनेम म्हणून देऊ शकतो. येथे 'निकनेम' बरोबर तुमचा खरा 'याहू आयडी' सुध्दा तुमचा मित्र पाहू शकतो हे आपण ध्यानात ठेवावे.
याहू आयडीमध्ये फक्त अक्षरे, क्रमांक आणि अंडरस्कोअर (_) हे अक्षरच चालू शकतो. माझा याहू आयडी'santosh_dhadnawar123' असा आहे. येथे मी कॅपीटल अक्षरात सुध्दा तो देऊ शकतो. परंतू शेवटी तो 'स्मॉल' केसमध्येच दाखविला जातो. याहू आयडी क्रमांकापासून सुरू होता कामा नये आणि याहू आयडीमध्ये एकापोठोपाठ एक दोनदा किंवा जास्त वेळैला '_s' हे अक्षर येता कामा नये. तसेच अवमानकारक शब्द याहू आयडीमध्ये चालत नाहीत.
याहू चॅटींग करत असताना याहू आयडी ऐवजी तुम्ही निकनेम वापरू शकता. त्यामुळे चॅटींग करणारे तुमचे मित्र तुमचे निकनेम पाहू शकतात. याहू आयडी आणि निकनेम एकमेकांपासून वेगळे असू शकतात. उदाहरणार्थ'santosh_dhadnawar123' हा याहू आयडी असलेल्या व्यक्तीचे निकनेम 'santosh' असे असू शकते.
आता आपणांस चॅटींगबद्दलची मुलभूत संकल्पना समजली असेल आता 'याहू मेसेंजर चा' उपयोग करून प्रत्यक्षरित्या चॅटींग कसे करावे हे समजून घेऊ. चॅटींग सुरू करण्याआधी www.yahoo.com या वेबसाईवरून तुम्ही याहू आयडी काढलेला आहे याची खात्री करून घ्य. एकदा याहू आयडी मिळाला की चॅटींग करण्यासाठी खालील कृती करा.
जर तुम्ही याहू मेसेंजर डाऊनलोड केलेला नसेल तर http://messenger.yahoo.com या वेबसाईटवर जाऊन तो डाऊनलोड करा येथे तुम्हास 'लीनक्स, युनिक्स, विंडोज अंशामधील तुम्ही काम करत अपणारी ऑपरेटींग सिस्टीम निवडावी लागते. आणि यानंतर योग्य ती याहू मेसेंजर फाईल डाऊनलोड करावी लागते. डाऊनलोडिंग झाल्यावर ती फाईल कार्यान्वित करून याहू मेसेंजर तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करा जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असाल तर तुम्ही डाऊनलोड केलेल्या .exe फाईलवर माऊसने दोनदा क्लीक करा आणि तुमचा मेसेंजर इन्स्टॉल होऊन जाईल.
2 पायरी (याहू मेसेंजर सुरू करणे)
याहू मेसेंजर यशस्वीरित्या इन्स्टॉल झाल्यावर आता तो आपणांस सुरू करायचा आहे. याहू मेसेंजर सुरू करण्यासाठी 'याहू मेसेंजर ' या डेस्कटॉपवरील आयकॉनवर दोनदा माऊस क्लीक करा. कृपया खालील आकृती पहा.
हा आयकॉन क्लीक केल्यावर तुम्हाला login ही विंडो दिसेल.
3 पायरी (याहू मेसेंजर मध्ये लॉगीन करणे)
* वरील आकृतीत दाखविल्याप्रमाणे तुमचा याहू आयडी आणि पसवर्ड टेक्स्टबॉक्समध्ये टाईप करा. आणि नंतर 'Sign In हे बटण दाबा. कृपया खालील आकृती पहा.
जर लॉगिन यशस्वीरीत्या झाले तर तुम्ही आधीच तयार केलेल्या मित्रांची यादी तुम्हाला दिसेल.वरील आकृतीत 'आनंद' आणि श्रीनिवास या दोन मित्रांची नावे तुम्ही यादीत पाहू शकता. जर त्यातीलकोणी मित्र याहू मेसेंजर ने इंटरनेट असेल तर त्याचे नाव ठळक अक्षरात दिसते.
4 पायरी (यादीमध्ये नविन मित्रांचे नाव घालणे)
गरज भासल्यास तुमच्या यादीमध्ये तुम्ही अजून मित्रांची नावे घालू शकता. यासाठी आकृतीत दाखविल्याप्रमाणे Contacts > Add a Contact हा पर्याय निवडा. येथे मेसेंजर तुम्हाला मित्राचा याहू आयडी लिहीण्यास सांगेल. येथे याहू आयडी टाईप केल्यावर तो मित्र तुमच्या यादीमध्ये समाविष्ट होईल.
5 पायरी (मित्राला संदेश पाठविणे)
आता आपणांस यादीतील एखाद्या मित्राशी चॅटींग करायचे आहे. याहू मेसेंजर मध्ये हे खुपच सोपे आहे. ज्या मित्राशी तुम्हाला चॅटींग करायचे असेल त्या मित्राच्या नावावर दोनदा क्लीक करा याने एक विंडो उघडेल. या विंडोमधील टेक्स्टबॉक्समध्ये तुमचा संदेश टाईप करा आणि 'Send' हे बटण दाबा.
तुम्ही 'Send' बटण दाबल्यावर तो संदेश ताबडतोब तुमच्या मित्राकडे जाईल. जर तो याहू मेसेंजर वर उपस्थित असेल त्याला तो संदेश पहावयास मिळेल. तसेच तुम्ही सुध्दा तुमचा संदेश पहावयास मिळेल. तसेच तुम्ही सुध्दा तुमचा संदेश विंडोमध्ये पाहू शकता. कृपया आकृतीत पहा.
6 पायरी (याहू मेसेंजर मधून बाहेत पडणे)
अशा प्रकारे तुम्ही अनेक संदेश तुमच्या मित्राला पाठवून त्याच्याशी बराच वेळ चॅटींग करू शकता. जर तुम्हाला एखाद्या मित्राबरोबर चॅटींग बंद करायचे असेल तर त्याच्यासाठी उघडलेली विंडो तुम्ही बंद करू शकता. जेव्हा तुमचे चॅटींग संपेल तेव्हा याहू मेसेंजरमधून बाहेर पडण्यासाठी आकृतीत दाखविल्याप्रमाणे Messenger > Sign Out हा पर्याय क्लीक करा.

No comments:

Post a Comment