Monday, 26 September 2011

इंटरनेटचा इतिहास

1970 च्या दशकात संगणकांमधिल संदेश वहन सुरक्षीत कसे करता येईल हया गरजेतुन `डार्पा' द डिफेन्स ऍडव्हान्ष्सड रिसर्च प्रॉजेक्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन नी एक संशेधन हाती घेतले. हया सुरवातीतून इंटरनेटचा जन्म झाला. त्यानंतर 20 वर्षे ते मिलीटरी व शैक्षणीक नेटवर्क म्हणून वापर होता. आधी देशभरातील मग जगभरातील संगणक जोडले गेले.
इंटरनेटची संकल्पना अतिशय साधी आहे व त्या पुढील प्रकारे मांडता येते
संगणक एका वायरनी जोडले जातात. एक संगणक दुसऱ्या संगणकाशी बोलण्यासाठी परवानगी घेण्यासाठी संदेश पाठवतो. दुसरा संगणक जर `बिझी' असेल तर तो `प्लीज थांबा' असा संदेश पाठवतो'Granting Permission' असा संदेश पाठवतो. दोन्ही संगणकांमधे एकाच प्रकारचे सॉफ्टवेअर असल्याने त्यांना संदेश बरोबर समजतात व डेटाची देवाण-घेवाण होते. आधीच्या उदाहरणातीलनेटवर्क साधे सुटसुटीत होते. आता नुसत्या वायर ऐवजी हे दोन संगणक इंटरनेटनी जोडले आहेत. म्हणजेच त्या संगणकांबरोबर कित्येक डझन संगणक संपर्क करू इच्छित असतील.
आता परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे? ती खरंच तशी आहे? संगणक `अे' ला संगणक `बी' बरोबर बोलायचे आहे, पण त्यांच्या मधे जवळजवळ 3000 मैलांचे अंतर आहे. इंटरनेट मधुन डेटा किती ठिकाणी जातो या बाबत युझर अनभिज्ञ असतो. `अे' व `बी' मधील लिंक अनेक प्रकारे होऊ शकते, कि शेकडो किंवा हजारो मैल अंतर पार करून डेटा दुसऱ्या संगणकाकडे पोचू शकतो. तुम्हाला फक्त एवढे माहित असले की पुरे की डेटा दुसऱ्या संगणकाकडे पोचेल.
1980 च्या दशकात संगणक क्षेत्रात खूप बदल झाले व त्याबरोबर इंटरनेट मधे ही अधिकाधिक व्यावसायिक व वेयक्तिक संगणक `ऑन-लाईन' जात होते, व लवकरच त्यांनी मुळ `युझर्स'ची संख्या ओलांडली1990 च्या दशकात संगणक `कोशीत युध्दाच्या समाप्ती नंतर मिलीटरी कम्युनिकेशन्समधे सुधारणा झाल्या व `कनेक्टेड' युगाची सुरूवात झाली. मुळचे मिलीटरीतील युझर्स संदेशवहनासाठी इतर साधनांकडे वळले. इंटरनेट आतच्या प्रमाणेच जागतिक स्तरावरील संगणकांचे नेटवर्क होते.
डेस्कटॉप मधील सुधारणांबरोबर इंटरनेटवरही `ग्राफीक्स' मधे सुधारणेची गरज भासू लागली. तो पर्यंत इंटरनेट हे `टेक्स्ट' मजकूर प्रधान होते.`ग्राफीक्स' सुविधा वापरली गेली त्याला HTML म्हणतात, युझर्सना ग्राफिक्स बघता यावे म्हणून ही विकसित झाली. इंटरनेट स्थिरावले असल्याने फक्त ट्रान्समिशन माध्यमात सुधारणा आवश्यक होती. ते तंत्रज्ञान म्हणजे वर्ल्ड वाईड वेब किंवा वेब.

No comments:

Post a Comment