Monday 26 September 2011

इनपूट आउटपूट साधने

आपला संगणक जर सभोवतालच्या वातावरणाशी संपर्क साधू शकला तरच तो खरा उपयोगी ठरेल. जेव्हा आपण संगणकावर काम करत असता तेव्हा संगणकाला सूचना देण्यासाठी ज्या साधनाचा वापर करतो त्या स्रव साधनान 'इनपूट डिव्हाईस' (Input Device) असे म्हणतात. तसेच संगणक तुमच्या सूचनांवर प्रक्रीया करून बाहेरील विशिष्ठ साधनावर तुम्हाला उत्तर दाखवितो. या साधनाला 'आउटपूट डिव्हाईस' असे म्हणतात.
तुमच्या कामाच्या स्वरूपावरून कोणते डिव्हाईस तुम्हाला जास्त उपयुक्त ठरेल हे पहावे लागते. आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार प्रत्येक डिव्हाईसची माहीती घेऊ ही सर्व डिव्हाईस सी.पी.यु.च्या सभोवताली मांडलेली असल्याने त्यांना 'पेरीफेरल डिव्हाईसेस' (Peripheral Devices) असेही म्हणतात.
 
 
आपण संगणकाला दिलेली माहिती संगणकाला समजू शकेल अशा भाषामध्ये परावर्तीत करणे हे 'इनपूट डिव्हाईसचे' काम असते. आता आपण इनपूट डिव्हाईस कोण कोणते आहे हे पाहू. ते पुढील प्रमाणे
 
 
कीबोर्ड हे इनपूट डिव्हाईस असून ते प्रत्येक संगणकाला जोडले असते. कीबोर्डची रचना आपल्या सामान्य टाईप रायटरप्रमाणेच असते.की बोर्डवर काही विशिष्ट बटणेही असतात. कीबोर्डवरील आवश्यक आशी बटणे दाबून संगणकाला योग्य आशी सुचना देता येते.संगणकाला किबोर्डवरील बटण दाबल्याने निर्माण होणारा इलेक्टत्रीकल संदेश समजतो.
 
 
आकृतीत दाखविल्याप्रमाणे 'माउस' हे सुध्दा एक इनपूट डिव्हाईस आहे जे तुमच्या संगणकाला जोडलेले असते.माउसच्या साह्हयाने संगणकाला संदेश दिला जातो. 'माउस' एका गोलाकृती चेंडूवर हालचाल करू शकतो आणि माउसच्या वरच्या भागात दोन किंवा तीन बटण असतात. जेव्हा आपण माउस सपाट भागावरून पुढे / मागे करता तेव्हा Screen वरील माउसचा कर्सर त्याच दिशेने पुढे / मागे हालचाल करत असतो.माउसचा वापर करून आपण screen वर जलदगतीने आणि सोप्या पध्दतीने हालचाल करू शकतो.
 
 
कीबोर्डचा वापर करून आपण फक्त अक्षरेच संगणकाला देऊ शकतो. पण जर एखादे चित्र आपणांस संगणकाला इनपूट म्हणून द्यायचे असेल तर ते कीबोर्डच्या सहातय्याने देणे शक्य नसते. परंतू हे स्कॅनरच्या माध्यमातून शक्य होते. स्कॅनरमध्ये मॅगनेटीक इंक कॅरॅक्टर रेकोगनिशन (MICR) ऑप्टीकल मार्क रीडर (OMR) आणि ऑप्टीकल कॅरॅक्टर रीडर (OCR) या कार्यप्रणाली असतात.



 
 
 
 
मॉनीटर हे अत्यंत प्रभावी आउटपूट डिव्हाईस आहे. याला कधीकधी 'व्हिज्युअल डीस्प्ले युनिट (VDU) असेही म्हणतात. मॉनिटर ही एक बॉक्स असून ती संगणकापासून पुर्णत: वेगळी असते. की बोर्डच्या सहातय्याने आपण माहिती संगणकाला देऊ शकतो तसेच मॉनिटरच्या सहातय्याने सुध्दा आपण संगणकाला विशिष्ठ सुचना देऊ शकतो. मॉनिटर संगणकाला एका केबलच्या सहातय्याने जोडलेला असतो. म्हनून या साधनाला 'आउटपूट डिव्हाईस' असे म्हणतात.
 
 
टर्मिनल हे एक प्रसिध्द इनपूट / आउटपूट डिव्हाईस आहे. टर्मिनलचे दोन भाग विभागणी करण्यात आली आहे. ते पूढील प्रमाने
१ हार्ड कॉपी टर्मिनल
२ सॉफ्ट कॉपी टर्मिनल
हार्ड कॉपी टर्मिनल पेपरवर छापून देऊ शकतात आणि सॉफ्ट कॉपी टर्मिनल फक्त मॉनिटरवरच विशिष्ठ माहीतीचे चित्रीकरण करू शकतात. टर्मिनल जेव्हा संगणकाला जोडला जातो तेव्हा तो प्रत्यक्षपणे संगणकाला सूचना पाठवू शकतो. टर्मिनलचे कधीकधी डम्ब (dumb) टर्मिनल आणि इंटेलिजन्ट टर्मिनल असे सुध्दा वर्गीकरण केले जाते.
 
 
 
प्रक्रीया करून मिळालेला मजकूर पानावर छापण्यासाठी प्रिंटर या आउटपूट डिव्हाईसचा उपयोग होतो. वेगवेगळया उपयोगासाठी वेगवेगळया प्रकारचे प्रिंटर उपलब्ध असतात. त्यांच्या छपाईचा वेग, छपाईची पध्दत यांच्या आधारा वरून इम्पॅक्ट (Impact) आणि नॉन-इम्पॅक्ट (non-Impact) प्रिंटर असे प्रिंटरचे वर्गीकरण करता येते.

इम्पॅक्ट प्रिंटरची कार्यप्रणाली टाईप रायटरप्रमाणे असते. म्हणजेच हातोडीने ठोकल्याप्रमाणे अक्षरे पानावर उमटतात आणि तुमचा मजकूर छापला जातो. यासाठी पेपर आणि शाईची रीबन (ink ribbon) वापरली जाते. 'डॉट मॅटक्स' (dot Matrix) प्रिंटर या प्रकारचे असतात. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर वेगळया पध्दतीने काम करतात. ते इलेक्टत्रो-स्टॅटीक रासायनिक पदार्थाचा आणि इंक-जेट तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. लेजर प्रिंटर आणि इंक-जेड प्रिंटर या प्रकारचे असतात. या प्रकारचे प्रिंटर उच्च दर्जाची छपाई करू शकतात.

No comments:

Post a Comment