Tuesday 6 January 2015


क्लाउड कंप्युटिंग' - म्हणजे काय
ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच. हास्य संगणक विश्वात झालेली क्रांती ही, 'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्‍या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन आज ती 'क्लाउड कंप्युटिंग'पाशी येऊन पोहोचली आहे. सध्या सगळीकडे क्लाउड कंप्युटिंगचा नारा ऐकू येतो आहे. कंपन्यांच्या IT डिपार्टमेंट्समध्ये तो एक बझवर्ड झाला आहे. तर काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. चला तर मग बघुयात काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग... समजा तुम्ही एक संगणक तुमच्या वैयक्तिक वापरासाठी विकत घेणार आहात. त्यासाठी तुम्ही इंटेलचे हार्डवेयर असलेला संगणक फायनल केलात. त्या हार्डवेयरच्या डिव्हाइस ड्रायव्हर्सची एक DVD तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला एक ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, ती तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज ठरवलीत. त्यासाठीही तुम्हाला एक OS DVD मिळेल. त्या DVD साठवण्यासाठी तुम्हाला एक बॉक्स घ्यावा लागेल. आता संगणक घेतलात तर त्यावर तुम्ही काही अ‍ॅप्लिकेशन नक्कीच चालवणार असाल (म्हणजे त्याचसाठी तुम्ही संगणक घेत आहात हे गृहीत धरले आहे हास्य ) तर त्या अ‍ॅप्लिकेशन्सच्याही DVD मिळतील व त्या तुम्हाला संभाळून ठेवाव्या लागतील. त्यासाठी आधिचा DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे तुम्हाला एक मोठा DVD बॉक्स घ्यावा लागेल. काही वर्षांनंतर तुमचे हार्डवेयर जुने झालेले असेल त्यातले काही भाग तुम्ही बदलायचे ठरवले. पुन्हा नविन डिव्हाइस ड्रायव्हर्सच्या DVD तुम्हाला मिळाल्या. परत DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे पुन्हा नविन बॉक्स. आता तुमच्या अ‍ॅप्लिकेशनचे नवे वर्जन आले आहे आणि तुम्ही ते विकत घ्यायचे ठरवले. त्याच्या पुन्हा नव्या DVD. आता तुम्ही तुमच्या मुलाकरिता अजुन एक नविन संगणक घ्यायचे ठरवता. काही आप्लिकेशन्सची जुनी वर्जन्स तुमचा मुलगा वापरणार आहे. परत नविन बॉक्स मुलासाठी. ह्या प्रत्येक वेळी तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार. ह्यात मध्येच काही DVD ऐनवेळी खराब झाल्या तर मग तुम्हाला पुन्हा नविन DVD मिळविण्याची मारामार करावी लागणार. पुन्हा तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार. येवढी यातायात जर एक-दोन संगणकांसाठी असेल तर शेकडो / हजारो कर्मचारी काम करत कंपन्यांचे काय होत असेल याचा विचार करा. ह्या सर्व हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर विकत घेण्याच्या आणि त्याच्या मेंटेनंन्ससाठी येणार्‍या खर्चाला 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (TCO)' म्हणतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांची ही कॉस्ट अतिशय प्रचंड असते, त्यासाठी जे कुशल मनुष्यबळही लागते तेही प्रचंड महाग असते. 'क्लाउड कंप्युटिंग' नेमके ह्याच समस्येवर उत्तर आहे. आजच्या युगात क्लाउड कंप्युटिंग पुढे रेटण्याचा मुख्य मार्केटिंग मंत्र म्हणजे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' पासून सुटकारा. 'तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आमचे' हे क्लाउड कंप्युटिंग सेवा पुरवठादारांचे ब्रीदवाक्य आहे. हास्य क्लाउड कंप्युटिंग म्हणजे सर्व, ऑपरेटींग सिस्टीम, अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर आणि डाटा (माहिती) हे एका मध्यवर्ती, प्रचंड आकाराच्या (लॉजिकली) संगणकावर ठेवायचे. त्या मध्यवर्ती संगणकाची संगणनशक्ती वापरून ती OS, अ‍ॅप्लिकेशन्स त्या संगणकावर रन करायची आणि डाटा/डॉक्युमेंट्स (माहिती) त्याच मध्यवर्ती संगणकाच्या मेमरीत साठवून ठेवायचा. ह्या मध्यवर्ती संगणकासाठी लागणार्‍या हार्डवेयरची जबाबदारी ह्या मध्यवर्ती संगणकाची सेवा पुरवठा करणार्‍याची असणार. आता नविन हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर तुम्हाला आपसुकच अपग्रेड होऊन मिळणार. थोडक्यात सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर ह्या तुम्हाला सेवा म्हणून मिळणार. तुम्ही फक्त त्या सेवा वापरण्याचा मोबदला सेवा पुरवठादाराला द्यायचा. एकढाच तुमचा खर्च. बाकीची सगळी यातायात तो सेवा पुरवठादार तुमच्यासाठी, तुमच्या वतीने करणार. क्लाउड कंप्युटिंग ही काही नविन टेक्नॉलॉजी नाहीयेय. ते डाटा सेंटर्सच्या रूपात होतेच. पण दिवसेंदिवस जलद होत जाणार्‍या इंटरनेच्या प्रभावी वापरामुळे त्याचे एक नविन मॉडेल बनवण्यात आले ज्याद्वारे संगणकीय रिसोर्सेस प्रचंड मोठ्या स्केल मध्ये प्रभाविपणे वापरता येणे शक्य होईल. बरं ठीक आहे, पण मग त्याला 'क्लाऊड' असे नाव का? तर जेव्हा इंटरनेट आले तेव्हा वेगवेगळया आकृत्यांमध्ये इंतरनेट दर्शवण्याची खूण होती ढग, क्लाउड.

(चित्र आंतरजालावरून साभार)
क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे इंटरनेट. त्यामुळे क्लाउड हे नाव 'रूपक' म्हणून वापरले गेले आहे, मध्यवर्ती संगणकाच्या अमूर्त रुपासाठी. तर हे असे आहे अमूर्त रुप क्लाउड कंप्युटिंगचे:

Monday 5 January 2015

लिनक्स

1) स्टेल्यारिअम : विनामूल्य तारामंडळ प्रतिकृती

       आज आपण stellarium या तारामंडल प्रतिकृतिची माहिती घेवू. हे सोफ्टवेअर विनामूल्य असून त्याचे संस्करण विंडो, लिनक्स व  म्याकिन्तोष कॉम्प्युटर साठी उपलब्ध आहेत.  हे सोफ्टवेअर मिळवण्यासाठी


येथे क्लिक करा
.



stellarium


यामध्ये मेनू दोन ठिकाणी दिसून येतो, खालील डाव्या कोपऱ्यात दोन्ही बाजूला याचे मेनू दिसतात. हे मेनू दृष्टीपथास येण्यासाठी तेथे मावूस न्यावा लागतो. तुम्ही यामध्ये आपले शहर निवडू शकता. तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी जी वेळ असेल त्या वेळी आकाशात तारामंडळाची  स्थिती तुम्हाला कॉम्प्युटर वर दिसू लागते.

हे सोफ्टवेअर आकाशाची त्रि आयामी प्रतिकृती दाखवते, तुम्ही यामध्ये कीबोर्डवरील बाणांचा व माउसच्या स्क्रोल व्हील चा वापर करून आकाशात भ्रमण केल्याचा अनुभव घेवू शकता. कोठल्याही ताऱ्यावर किंवा ग्रहावर क्लिक केल्यास त्याची संपूर्ण माहिती कॉम्प्युटर स्क्रीन च्या डाव्या बाजूला वरील कोपऱ्यात दिसू लागते. तसेच भूतकाळात किंवा भविष्यात एखाद्या ठराविक वेळी ग्रह ताऱ्यांची स्थिती कशी दिसेल हे पाहण्याची व्यवस्था ही यामध्ये केलेली आहे.  तसेच नक्षत्रांची स्थिती देखील तुम्ही यामध्ये पाहू शकता .




तुम्ही यामध्ये भाषेच्या पर्यायामधून मराठी निवडल्यास सारे मेनू व ग्रह ताऱ्यांची नावे देखील मराठी मध्ये दिसतात.



stellarium-marathi


या सोफ्टवेअर मध्ये खूप पर्याय आहेत . आज मी जे समजलो ते तुम्हाला येथे सांगत आहे. पुढील भागात यामधील इतर सोयींची माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

    



2) लिनक्स चे फायदे  

                     

आज आपण लिनक्स च्या वापरा संबंधी काही गोष्टींचा विचार करू.

लहान मुलांना जर आपण खेळणी आणून दिली तर ते खेळ शिकतात. शाळेमध्ये देखील मुलांना खेळणी दिली जातात. जर ही खेळणी इतकी महाग झाली कि ते विकत घेणे सामान्यांना परवडेनाशी झाली तर सामन्यांची मुले खेळापासून वंचित राहतील. अशीच काहीशी बाब विंडो आणि सोफ्टवेअर संबंधात आहे.


 ubuntu soft center


आज आपण विंडो वर जे काही सोफ्टवेअर वापरतो त्याचा व्यावसाईक उपयोग करण्यासाठी आपल्याला ते सोफ्टवेअर विकत घेणे बंधनकारक असते. त्यामुळे आपल्या सोफ्टवेअर वापरण्यावर व शिकण्यावर बंधने पडतात. या उलट लिनक्स वर जे सोफ्टवेअर आहेत ते सारे मोफत आहेत, त्यामुळे आपल्याला विनासंकोच नवनवीन सोफ्टवेअर दावून्लोड करून इंस्टाल करून वापरून पाहता येतात. यामुळे आपल्या ज्ञानात ही भर पडते व आपण आपल्याला आवडलेले सोफ्टवेअर आपल्या मित्रांना आणि संबंधिताना विनामूल्य देवू ही शकतो.

हे विंडो वरील सोफ्टवेअर सोबत करता येत नाही. कारण तुम्ही विकत घेतलेला सोफ्टवेअर तुम्हाला फक्त एकाच कॉम्युटर वर वापरता येतो. एकापेक्षा अधिक कॉम्प्युटर वर वापरण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजून  वेगळा लायसंस घ्यावा  लागतो. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी  त्यांना लिनक्स चा कॉम्प्युटर वापरायला देणे अधिक सयुक्तिक ठरते.    

लिनक्स वापरण्यासाठी आपल्याला आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल. कोणीतरी ठरवून दिलेला अभ्यासक्रम ट्युशन लावून पूर्ण करणे आणि कसे तरी जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे हे आपल्याकडील शिक्षणाचे स्वरूप आहे.



चला आपण असे समजू कि हे सर्व आवश्यक आहे. तर या सर्वाचा अंतिम परिणाम काय आहे. आतापर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीने काय साधले याचा आपण विचार करू. आपल्या हे लक्षात येईल कि आपल्या समाजाच्या जीवतोड महेनतीचे फळ म्हणजे एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला लागणे किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागणे. कदाचित आपण यामध्ये काहीतरी विसरत आहोत. समाज जेव्हा एखाद्या गोष्टीचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रयत्नाच्या फलस्वरूप त्या समाजाचा ही विकास व्हावा हे आपण गृहीत धरतो. पण आतापर्यंत जेवढी मुले आपल्या देशातून शिकून बाहेरच्या देशात गेली किंवा येथेच कामाला आहेत त्यांनी या देशाच्या किंवा समाजाच्या विकासामध्ये काय हातभार लावला? अगदी नगण्य.  जास्तील जास्त त्या मुलांनी आपला आणि आपल्या कुटुंबियांचा आर्थिक विकास साधला, आणि जो विकास झाला तो ते काम करीत असलेल्या कंपन्यांचा झाला.



मायक्रोसोफ्ट सारख्या कंपन्या ज्या त्यांच्या मालकांना जगातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनवतात त्यांचा समाजाच्या विकासासाठी काय हातभार लागला? आपण मायक्रोसोफ्ट च्या सोफ्टवेअरचाच विचार करू. आज भारतात एक नवीन संगणक (सोफ्टवेअर शिवाय) विकत घेण्यासाठी जेवढे पैसे खर्च करावे लागतात त्याहूनही अधिक पैसे त्यावरील सोफ्टवेअर साठी खर्च करावे लागतात किंवा पायरेटेड सोफ्टवेअर वापरण्याची नामुष्की सहन करावी लागते.



तर हा मायक्रोसोफ्ट चा सामाजिक विकासासाठी हातभार आहे काय?



कदाचित तुम्हाला हे असे समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला मायक्रोसोफ्ट ची तुलना लिनक्स आणि ओपन सोर्स सोफ्टवेअर शी करावी लागेल. जगातल्या काही संवेदनशील प्रोग्रामर नी अनेक वर्षांच्या सेवाभावी कार्यामधून जे साधले आहे ते मायक्रोसोफ्ट ने अब्जावधी डॉलर आणि हजारो प्रोग्रामर च्या फौजेनेही साधले नाही. याला कारण काय? मायक्रोसोफ्ट ला जास्तीत जास्त पैसा कमवायचा असतो आणि लिनक्स व ओपन सोर्स हे लोकांना विनामुल्य सोफ्टवेअर उपलब्ध व्हावे या सद्हेतूने बनवलेले असतात.



जगात सर्व देशांमध्ये लिनक्स व ओपन सोर्स सोफ्टवेअर चा प्रसार ज्या वेगाने होत आहे ते पाहून आपण आश्चर्य चकित होऊ. जेव्हा मुलांच्या हातात पैशांच्या बंधनात न अडकलेले सोफ्टवेअर लागते तेव्हा त्यांच्या संगणक विषयक ज्ञानात व त्यायोगे त्यांच्या प्रतिभेच्या विकासात जी दैदिप्यमान भर पडते ती बाद अनुभवण्यासारखी आहे. 

मला लिनक्स आणि ओपन सोर्स सोफ्टवेअर ची तुलना ज्ञानेश्वरांनी मराठी मधून ज्ञानेश्वरी लिहून जे कार्य केले त्याबरोबर करावीशी वाटते. ज्याप्रमाणे संस्कृत मधून मराठी मध्ये गीतेचे भाषांतर करून मराठी भाषिकांना गीते चे ज्ञान खुले करून दिले, त्याच प्रमाणे लिनक्स आणि ओपन सोर्स सोफ्टवेअर बनवणाऱ्या ऋषी तुल्य प्रोग्रामर नी संगणकाचे ज्ञान मायक्रो सोफ्ट सारख्या कंपन्यांची मक्तेदारी मोडून सामान्य जनांसाठी कॉम्प्युटर चे सोफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध करण्याचे कार्य या आधुनिक ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. संगणकाचे ज्ञान आणि त्याचा उपयोग हा अर्थाधीष्ठीत कंपन्यांच्या हातात राहिल्यास समाजाची उन्नती कधीच होणार नाही. ज्ञान हे सहज आणि सर्वकाळ उपलब्ध असेल तर प्रत्येक जण त्याच आपल्या परीने आपल्या जीवनात उपयोग करून आपले जीवन आनंदमय बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. संगणकाचे ज्ञान हे सार्वत्रिक आणि विनामूल्य उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. सुदैवाने आज आपल्या समोर लिनक्स वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचा उपयोग सर्वांनी करून आपल्या आणि आपल्या समाजाची उन्नती साधावी हीच ईश्वरचरणी अपेक्षा. 

लिनक्स मराठीतून :भाग १:लिनक्सची ओळख आणि उबुंटू इन्स्टॉलेशन पाहुया .

लिनक्सची ओळख :

आपण सर्व जण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमशी एकदम परिचयाचे आहोत,विंडोज बरोबरच आणखी एक ऑपरेटिंग सिस्टीम उदयास आली होती तिचे नाव युनिक्स त्याच ऑपरेटिंग सिस्टीम चे पुढे लिनस [Linus Torvalds]याने लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये रुपांतर केले, लिनक्स रिलीज झाली ती 5 ऑक्टोबर 1991 ला आणि ती अतिशय प्रसिद्ध झाली.तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो कि ही लिनक्स म्हणजे लिनसचा “युनिक्सचा इम्युलेटर“हा कॉलेजचा प्रोजेक्ट होता तोच पुढे मोठा होऊन आज त्याची लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाली आहे.

आजही सर्व्हर्स पासून सुपर कॉम्प्युटर ते लहान डिव्हाईस मध्ये तसेच काही मोबाईल मध्ये सुद्धा लिनक्स असते.आपल्या नकळत आपण लिनक्स वापरात असतो.आज आपल्या परिचयाची उबंटू ,रेड हँट,फेडोरा इत्यादी ऑपरेटिंग सिस्टीम चा बेस हा लिनक्स हाच आहे.

लिनक्स कम्युनिटीचे जगभरातील डेव्हलपर याच्या सोर्स कोड मध्ये नवनवीन चेंज करून लिनक्स चा कोड समृद्ध करत असतात.आणि अशी ही मस्त ऑपरेटिंग सिस्टीम एकदम मोफत आहे तसे त्याचे काही डीस्ट्रीब्यूटर्स [रेड हँट,फेडोरा] काही त्यांच्या कस्टम्स ऑपरेटिंग सिस्टीम ला किंमत लावतात पण बेसिक लिनक्स एकदम मोफत आहे ते ही ऑफिशियली..

तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याचे इंटरन्ल्स शिकण्यासाठी आपणास काय यायला हवे…विंडोज वापरली आहे ना तुम्ही??….मग बास!!…मी आहे तुमच्या बरोबर,आपण मिळून जाऊया या लिनक्स च्या सफरीवर….
.मग तयार आहात ना लिनक्स शिकायला….

[ लिनक्स च्या घरात पोहचण्यासाठी पुढील लिंक वर टिचकी मारा.
http://www.linux.org/.]

आपण या अंकात लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करायची ते पाहणार आहोत.

आपण विंडोज वापरणारे असाल तर उबुंटू ही विंडोज ते लिनक्स प्रवास करणार्‍या लोकांसाठी मस्त आहे ज्यात युजर इंटरफेस विंडोज सारखा आहे पण याचा बेस लिनक्स आहे…

या लिनक्स ची अजून एक मजा म्हणजे तिचा सोर्स कोड ओपेन आहे आणि आपण पण यात आपले काहीतरी किडे करून काही भर घालू शकतो..आणि आपली स्पेशल ऑपरेटिंग सिस्टीम तयार करू शकतो,डिव्हाईस् ड्रायव्हर लिहू शकता …म्हणजे माझ्या सारख्या किडेखोर लोकांना पर्वणीच…तसे हे फार सोपे नाही ..आणि प्रयन्त केल्यावर अवघड पण नाही फक्त शिकायची तयारी पाहिजे…
उबुंटू इन्स्टॉलेशन :

चला मग किक मारुया……आपण आपली सिस्टीम विंडोज मध्ये बुट करा मग ते एक्स पी असो वा विंडोज ७.

सिस्टीम चालू झाल्यावर इंटरनेट ब्राऊजर ओपन करून ,

पुढील उबंटूच्या लिंकवर जा. http://www.ubuntu.com/download


आपण आपली आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम ठेवून त्याच बरोबर उबुंटू पण इन्स्टॉल करू शकतो त्यामुळे आपला डाटा पण जाणार नाही आणि आहे त्या सिस्टीम वर आपण लिनक्स एन्जोय करू शकता..

.त्यामुळे अजिबात घाबरू नका..बिनधास्त ट्राय करा…

त्यासाठी उबंटू मध्ये विंडोज इंस्टॉलर दिलेला आहे जो नॉर्मल इन्स्टॉलेशन सारखे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम सोबत नवीन लिनक्स इन्स्टॉल करून देतो.

त्यासाठी उबुंटू च्या साईटवर विंडोज इंस्टॉलर वर टिचकी मारा.


त्यानंतर आपणास हवे ते व्हर्जन ड्रॉप बॉक्स मधून सिलेक्ट करून गेट इंस्टॉलर वर टिचकी मारा.

व्हर्जन ड्रॉप बॉक्स यात LST हे स्टेबल व्हर्जन असते ज्याला उबंटू कडून लॉंग टाईम सपोर्ट दिला जातो.
]

इन्स्टॉलेशन

नंतर नेक्स्ट जाऊन “Not now, take me to the download › “ ला टिचकी मारावी ..[तसे तुम्ही दिलदार असाल तर उबंटू ऑर्गनायझेशन ला देणगी पण देऊ शकता].

नंतर आपणस पॉप अप मेसेज येईल तो सेव्ह करा वा रन करा.
.

रन सेटअप

मग उबंटू इंस्तोल होण्यास सुरवात होईल.

त्या दरम्यान आपणस युजर नेम पासवर्ड सेव्ह करावा लागेल.आणि उबुंटू साठी किती जागा द्यायची हे पण सांगावे लागेल.

त्यासाठी महिती खालील विंडोत भरावी
.

इनस्टॉलर विंडो

या विंडो वर किल्क करा कि झाले आपोआप उबुंटू इंस्तोल होईल आपल्या सिस्टीम वर…

३-४ वेळा सिस्टीम री स्टार्ट होईल आणि नंतर ती लॉग इन विन्डो ला येऊन थांबेल.

मग पासवर्ड देऊन सिस्टीम उबुंटू मध्ये घुसा..एक मधुर आवाज येईल आणि आपण लिनक्स मध्ये पोहचला असाल…इतके सोपे आहे सगळे.. :)
आता उबुंटू आणि विंडोज मधून आलटूनपालटून फिरण्याच्या टिप्स:

सिस्टीम रिस्टार्ट केल्यावर आपणस पुढील प्रमाणे उबंटू का विंडोज असे दोन पर्याय दिसतील .

आपणस त्यादोन्ही मधील एक पर्याय निवडून कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये परत जाता येईल.

जसा विंडोज ला खालच्या बाजूस टास्क बार असतो तसा उबंटू च्या वरच्या बाजूस टास्क बार असतो.

या टास्क बारच्या उजव्या बाजूस आपणस सिस्टीम रिस्टार्ट किंवा शट डाऊन करण्याचे पर्याय उपलब्द असतात.

विंडोज च्या प्रत्येक विंडोमध्ये विंडोज मोठी ,लहान किंवा बंद करण्यासाठी विन्डो च्या उजव्या बाजूस पर्याय असतात पण उबंटू मध्ये ते विन्डो च्या डाव्या बाजूस असतात.

उबुंटू विंडोच्या डाव्या बाजूस अप्लिकेशन विषयक पर्याय असतात.

वरील कोपऱ्यातील बटन हे विंडोज च्या स्टार्ट मेनू सारखे काम करते यात आपणस हावे ते अप्लिकेशन शोधून आपण ते उघडू शकतो.

खालील प्रमाणे आपला डेस्कटॉप आपणस दिसतो
….

उबुंटु

हळूहळू वापरण्यास सुस्र्वात केल्यावर आपणस उबंटू एकदम जमूनही जाईल…आणि नक्कीच मजा येईल.. काही तरी ग्रेट ऑपरेटिंग वापरात असल्याचा फील तर निर्विवाद ..!!!
लिनक्स च्या काही महत्त्वाच्या लिंक्स:

1] www.kernel.org :या लिंक वर लिनक्सचा सोर्स दिलेला असतो.

याच्या वरती लिनक्स चे स्टेबल व्हर्जन दिलेले असेल ते पण डाऊनलोड करून आपल्या सिस्टीम वर सेव्ह करू शकता.[उदा: 3.8.3 हे आत्ताचे स्टेबल व्हर्जन आहेते दर वेळी अपडेट होत असते.]

२]www.lkml.org : ही लिनक्स ची ऑफिशियल मेलिंग लिस्ट आहे.यात आपण भाग घेवू शकतो. आणि हवे ते आधीच्या मेल्स मधून शोधू शकतो.

या भागात काही शंका आल्यास वा कुठे अडल्यास नक्की विचारा MJ आहेच तुमच्या मदतीला…

[नोंद :मी दर आठवड्याला लिनक्सशी निगडीत एक पोस्ट लिहीत आहे आणि संपूर्ण लिनक्स प्रात्यक्षिकसह आपणसमोर सदर करणार आहे तेंव्हा आपणस अपडेट न चुकता मिळण्यासाठी आपला ई मेल आयडी ब्लॉगला subscribe करून नोंद करू शकता.]

माझा लिनक्स मराठीतूनहा प्रयोग कसा वाटला हे पण नक्की सांगा…मला सूचना ,सुधारणा व प्रतिक्रिया ऐकायला आवडतील.
लिनक्सची जान आणि शान : टर्मिनलची ओळख.
लिनक्स च्या नवीन आवृत्तीनां युजर इंटरफेस ची सुविधा आली असली तरी लिनक्स ची सुरवाती पासूनची ओळख आणि सर्वात महत्त्वाचे फिचर म्हणजे टर्मिनल विन्डो.
या विन्डोद्वारे आपण संपर्ण सिस्टीम कंट्रोल करू शकतो.
आपल्या विंडोज मध्ये जसा डॉस कमांड विन्डो असते तसेच उबुंटू मध्ये ही टर्मिनल विन्डो असते.
या लेखमाले अंतर्गत मी आपणस लिनक्सचा प्रात्यक्षिक वापर कसा करायचा यावर भर देणार आहोत.
लिनक्स इंटर्नल्स हे सध्या व सोप्या भाषेत आपणास कसे समजावून देता येईल याचा मी कटाक्षाने प्रयत्न करीत आहे.
मागील भागात आपण उबुंटू इन्स्टॉल कसे करायचे ते पहिले आत्ता आपण उबुंटू मध्ये आपली सिस्टीम बूट करा.
टर्मिनल विन्डो लाँच करण्यासाठी उबुंटूच्या डाव्या कोपर्‍यात असलेल्या उबुंटू सर्च बटन वर किल्क करा.आणि Terminal असे टाईप करावे .
मग आपणस खाली टर्मिनल विन्डो दिसेल ती सिलेक्ट करून आपण टर्मिनल उघडू शकतो.



आपण एकाच वेळी अनेक टर्मिनल्स उघडून त्या प्रत्येकावर अगदी निरनिराळे काम करू शकतो हे टर्मिनल्स

विन्डोचे आणखी एक विशिष्ट!!
आणखी एक गोष्ट म्हणजे लिनक्स ची कोणतीही ऑपरेटिंग सिस्टिम घ्या तिचा युजर इंटरफेस वेगळा असू शकतो पण शेल /टर्मिनल शक्यतो सेमच असतो.त्यामुळे एकदा का टर्मिनल मध्ये शिरला का मग ती कोणती पण लिनक्स ची ऑपरेटिंग सिस्टम असतो ती सारखीच भासते.
सिस्टम मध्ये काही इनस्टॉलेशन करायचे असल्यास वा इतर काही चेंजेस करायचे असल्यास आपणास सिस्टमचा अँडमिनिस्टर असावे लागते त्यासाठी आपणस टर्मिनलवर रूट अकौंट तयार करून त्याद्वारे लॉग इन करावे लागते ही बेसिक स्टेप पहिला आपण शिकूया.

रुट अकाऊंट तयार करणे.
१)प्रथम टर्मिनल विन्डो ओपेन करा.
२)विन्डोमध्ये आपण ज्यानावाने लॉग इन केले असेल ते नाव दिसेल.
३)नंतर “sudo passwd root” ही कमांड वापरा.
४)त्यानंतर आपल्या सिस्टीमचा पासवर्ड विचारल्या प्रमाणे दोनदा टाका.
५)नंतर “su root” ही कमांड वापरा.
६)आणि रूट या अकौंटसाठी नवा पासवर्ड (ex:root) असा देणे.
७)मग आपण रूट या अकौंटवर लॉग इन झालेले असता.
८)ते आपणास एनटर बटन दाबल्यावर सुरवातीला जेथे आपले युजर नेम होते तेथे रुट हे नाव आलेले दिसेल.
९)पुढच्या वेळेला परत रूट मध्ये जायचे असल्यास फक्त “su root”आणि पासवर्ड दिला कि आपण रुट मध्ये लॉग एन होतो.

अधिक महितीसाठी खालील छायाचित पहा.



आता आपण सज्ज झाले आहात टर्मिनल चा पूर्णतः वापर करण्यासाठी…

टर्मिनलच्या कमांड्स :

खालील शेल कमांड्स लिनक्स व युनिक्स साठी सेमच आहेत.

ls :हि कमांड चालू डिरेक्टरी मधील फाईल आणि फोल्डर दाखवते.

pwd :कमांड चालू डिरेक्टरी कोणती त्या डिरेक्टरीचे लोकेशन दाखवते.

ps :हि कमांड संगणकातील चालू प्रोसेस दाखवते.

cat : हि कमांड चालू फाईल मधील कंटेंट दाखवते.

cp :हि कमांड फाईल कॉपी साठी वापरतात यात cp जुनी फाईल नवीन फाईल असे वापरतात.

mv :हि कमांड फाईल चे नाव बदलण्यासाठी वापरतात. mv जुने नाव नवीन नाव.

rm: हि कमांड फाईल डिलीट किंवा रिमुव्हल साठी वापरतात.

echo :हि कमांड अर्ग्युमेंट पाठवण्यासाठी वापरतात.

grep :एखाद्या फाईल मधून विशिष्ट शब्द असणारी ओळ शोधणे. grep शब्द फाईलचे नाव

sort :एखादी फाईल वाचून त्यातील डाटा ओळीने लावला जातो आणि तो परत फाईल मध्ये लिहला जातो.

mkdir :नवीन डिरेक्टरी तयार करणे.

exit :टर्मिनल बंद करणे.

[Ref:Unix Made Easy:Tata McGrow-hill:Muster]

व्हर्चुअल एडीटर:

टर्मिनल मध्ये प्रोग्रेम लिहिण्यासाठी व्हर्चुअल एडीटर म्हणजेच VI एडिटर वापरतात.

त्याचेच सुधारित व्हर्जन VIM हे पण लिनक्स ने दिलेले आहे फक्त त्यात कोड निरनिराळ्या कलर कोड मध्ये दिसतो बाकी VIM हे अंतर्गत vi एडीटरच वापरात असते.
vi एडीटर हा एकतर कमांड मोड मध्ये किंवा इन्सल्ट मोड मध्ये चालतो म्हणजे एक तर कोड लिहू शकतो नाहीतर कोड मध्ये बदल करू शकतो पण दोन्ही एकाच वेळी नाही.

कमांड मोड मध्ये एडीटर रीड ओन्ली मोड मध्ये चालतो.

प्रथम vi फाईल चे नाव अशी कमांड देऊन आपण फाईल एडीटर मोड मध्ये उघडू शकतो.

नंतर i बटन दाबून मग आपण त्या एडीटर मध्ये लिहू शकतो.लिहून झाल्यवर Esc बटन दाबल्यावर एडीटर रीड ओन्ली मोड मध्ये जातो.
कर्सल हलवण्यासाठी h, j,k,l हि बटणे वापरतात.

एडीटरच्या फाईल मधून एखादा शब्द शोधायचा असल्यास /शब्द असा शोधला जातो.आणि पुढचा शब्द पाहण्यासाठी परत n बटन दाबून नेक्ट जाता येते.
एडीटर मधून बाहेर पडण्यासाठी Ctrl+Q बटन दावाव आणि नंतर q! कमांड वापरावी. आणि फाईल सेव्ह करून बाहेर पडण्यासाठी wq!हि कमांड वापरावी.
एखादी ओळ डिलीट करण्यासाठी dd हि कमांड वापरावी.

एखादी ओळ जर चुकून डिलीट झाली असेल तर तिला परत आणण्यासाठी u कमांड वापरावी.

एखादे अक्षर डिलीट करण्यासाठी कमांड मोड मध्ये जाऊन त्या अक्षरावर कर्सलनेऊन x बटन दाबावे.

एखाद्या शब्दाच्या पुढून चालू कारचे असल्यास त्या शब्दावर जाऊन a हे बटन दाबा

Wednesday 1 August 2012

संगणक कार्डस

व्हिडीओ कार्ड :- याना ग्राफिक्स कार्ड ही म्हणतात अशा प्रकारचे कार्ड CPU चे आउट पुट मॉनिटर वर दाखवण्या साठी आपल काम करतात . हे कार्ड CUP मध्ये जोडलेले असते . इलेक्ट्रानिक्स संदेश चे व्हिडीओ मध्ये रूपांतरण करण्याच काम हे व्हिडीओ कार्ड करतात यामुळे आपण दृश मॉनिटर वर पाहू शकतो . याला डिसप्ले कार्ड्स देखिल म्हणतात .


साउंड कार्ड :- ही कार्ड मायक्रो फोन द्वारे इनपुट घेतात आणि त्याना संगणक प्रक्रिया करू शकेल अशा रितीने रूपांतरित करतात , तसेच ही कार्ड्स अंतर्गत इलेक्ट्रानिक्स संदेशाचे ऑडियो संदेशात रूपांतरण करतात. ज्या मुळे आपणास संगणकातुन संगीत ऐकायला येते . ह्या कार्ड शिवाय संगणका मधून ध्वनी ऐकायला येत नाही . माइक देखिल ह्याला आपण कनेक्ट करू शकतो ज्यामुळे आपण माइक मध्ये हे बोलू ते संगणकाच्या स्पीकर वर ऐकायला येते .


टीव्ही टुनेर कार्ड :- आता तुम्ही टीवी देखिल पीसी वर बघू शकतो .शिवाय एखादा व्हिडीओ देखिल कैपचर म्हणजे रिकॉर्ड करू शकतो . त्याच वेळेस तुम्ही पीसी वर दुसरे काम ही करू शकता . या कार्ड्स ला टेलेव्हीजन बोर्ड , व्हिडीओ रेकॉर्डर कार्ड्स आणि व्हिडीओ कैपचर कार्ड्स ही म्हणतात . यात टीवी टुनेर आणि व्हिडीओ कनवर्ट असतो त्या मुळे टीवी चा संदेशाचे रूपांतर होवून संगणकाच्या मॉनिटर वर दिसते . टीव्ही टुनेर कार्ड मध्ये २ प्रकार आहेत एक अंतर्गत आणि बाह्य . अंतर्गत मध्ये हे कार्ड CPU च्या आता म्हणजेच मदर बोर्ड वर बसवलेले असते . जो पर्यंत पीसी सुरु नाही तो पर्यंत आपण टीवी मॉनिटर वर पाहु शकत नाही म्हणजेच टीवी बघायला देखिल पीसी सुरु करणे गरजेच असत . याच एक विशिष्ट आहे की आपण जर घरात नसलो आणि एखादा टीवी वरचा कार्यकर्म रिकॉर्ड म्हणजेच सग्रहित करायच असेल तर आपण तो टाइम सेट करून करू शकतो .

ऐक्सटेर्नल कार्ड ह्या मध्ये बाह्य स्वरूपात मोडम प्रमाणे टीवी टुनेर कार्ड असते . एखाद्या बॉक्स प्रमाणे टीवी टुनेर कार्ड दिसते . अशा कार्ड मध्ये वेगळी पॉवर सप्लाई ह्या कार्ड ला द्यावी लागते. हयात आपल्याला हवा असणारा कार्यक्रम किवा व्हीडीओ रिकॉर्ड करता येत नाही . परन्तु ह्या कार्ड च एक वैशिष्ठ आहे की टीवी बघण्यासाठी आपल्याला पीसी सुरु करण्याची गरज भासत नाही . केवल मॉनिटर च्या सहयाने आपण संगणकाच्या मॉनिटर वर टीवी पाहु शकतो. दोन्ही प्रकारच्या टीव्ही टुनेर कार्ड सोबत टीवी प्रमाणे रिमोट कण्ट्रोल मिळतो.

Tuesday 4 October 2011

विंडोज XP मधिल खराब झालेल्या फाईल्स दुरुस्त करा.

बर्‍याच वेळेस एखादे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधून काढल्यानंतर अथवा एखादे हार्डवेअर काही काळानंतर ते कॉम्प्युटरमधून Remove/Uninstall केल्यानंतर त्याचा प्रोग्रॅम काढल्यानंतर एखादा एरर चा मॅसेज विंडोज सुरु करताना येतो. म्हणजेच त्या प्रोग्रॅम अथवा हार्डवेअरच्या फाईल्स अथवा डाईव्हर्स काढताना त्यामध्ये विंडोज XP च्या काही महत्त्वाच्या फाईल्स देखिल डिलीट झाल्या असल्यास त्यामूळे विंडोज XP मध्ये काही प्रोग्रॅम्सना प्रॉब्लेम येते असल्यास एरर चा मॅसेज विंडोजच्या सुरुवातीला दाखविला जातो.

हा प्रोब्लेम प्रामुख्याने विंडोजच्या रजिस्ट्रीमध्ये निर्माण झालेने विंडोजच्या सुरुवातीलाच हा एरर मॅसेज दाखविला जातो. विंडोजमधिल काही महत्त्वाच्या फाईल्स डिलीट झाल्याने तसा एखादा मॅसेज दाखविला जातो. विंडोज रजिस्ट्रीमध्ये निर्माण झालेला हा प्रोब्लेम ठिक करण्यासाठी "रजिस्ट्री क्लिनर" सारखे प्रोग्रॅम्स वापरले जातात (असे प्रोग्रॅम्स इंटरनेटरवर मिळतात) पण बर्‍याच वेळेस आपण स्वतः देखिल अशा प्रोग्रॅम्सशिवाय विंडोजमधिल एखादा एरर ठिक करु शकतो. हा एरर काढण्यासाठी देखिल विंडोजमध्ये सोय केलेली आहे.

विंडोजमध्ये मध्ये त्यासाठी SFC SCAN ही कमांड वापरली जाते. या कमांडद्वारे विंडोजच्या रजिस्ट्रीमध्ये डिलीट अथवा खराब झालेल्या फाईल्स शोधून त्या बदलल्या जातात व निर्मा़ण झालेला प्रोब्लेम ठिक केला जातो व नंतर विंडोजच्या सुरुवातीलाच येणारा एरर मॅसेज बंद होतो. अशाप्रकारे SFC SCAN ही कमांड वापरताना विंडोजची म्हणजेच आपण जर विंडोज XP वापरत असाल तर विंडोज XP ची CD अथवा विंडोज VISTA वापरत असाल तर विंडोज VISTA ची CD विचारली जाते, ती CD ड्राईव्हमध्ये असणे आवश्यक आहे.

ही कमांड वापरण्याची क्रिया खाली दिली आहे.





१. स्टार्ट बटणावरील 'रन' या बटणावर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर 'रन' या विभागातील विंडो उघडेल. त्यामध्ये cmd हे टाईप करुन 'OK' या बटणावर क्लिक करा.



३. आता आपल्यासमोर काळ्यारंगाची डॉस प्रॉम्प्टची विंडो उघडेल, त्यामध्ये sfc/scannow असे टाईप करुन एंटरचे बटण दाबा व ती डॉस प्रॉम्प्टची काळी विंडो बंद करा.


४. आता आपल्यासमोर 'Windows File Protection' चा प्रोग्रॅम सुरु होईल. लक्षात असू द्या हा प्रोग्रॅम वापरताना वर सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये सीडी असणे आवश्यक आहे

कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची कार्यक्षमता तपासा

साधारणपणे आपण प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लोड करतो. म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरमध्ये कुठलाही व्हायरस घुसून कॉम्प्युटर बिघडू नये यासाठी आपण चांगल्यातला चांगला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लोड करतो.

कुठलाही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर हा चांगलाच असतो तो आपआपल्यापरीने कॉम्प्युटरमधिल व्हायरस शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर जर वेळोवेळी अपडेट केल्यास तो चांगल्याप्रकारे काम करतो. असे असले तरी आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची कार्यक्षमता किती आहे हे आपणास माहित नसते. आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर एखादा व्हायरस लगेच शोधू शकतो का? हे पडताळण्यासाठी आपणच त्याती परीक्षा घेवूया. म्हणजेच एक खोटी व्हायरस सदृश फाईल बनवून ती फाईल कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर शोधतो का ते पहायचे. खरंतर ही फाईल व्हायरस नसुन अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला फसविण्यासाठी हा प्रयत्न आहे.

१. Start > Programs > Accessories मधिल Notepad प्रोग्राम सुरु करा.




२. आता आपल्यासमोर नोटपॅड प्रोग्राम सुरु होईल. त्यामध्ये खाली दिलेली ओळ कॉपी/पेस्ट करा.

X5O!P%@AP[4\PZX54(P^)7CC)7}$EICAR-STANDARD-ANTIVIRUS-TEST-FILE!$H+H*



३. आता इतर काहिही टाईप न करता ती फाईल virus.com नावाने कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.

४. आता आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सुरु करुन कॉम्प्युटर स्कॅन करा. पहा जर ती फाईल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने दाखविली तर चांगलेच आहे. नाहीतर तुम्हीच विचार करा.

कॉम्प्युटरवरील आपल्या कामाचे पुरावे कसे लपवाल !

बर्‍याच वेळा तुम्ही एखाद्या कॉम्प्युटरवर काम केल्यानंतर इतर कुणीही व्यक्ती इतकेच की तुम्हीसुद्धा त्या कॉम्प्युटरवर काय काम केले हे सांगू शकता. कारण कुणीही एखाद्या कॉम्प्युटरवर केलेल्या कामाची तो कॉम्प्युटर नोंद ( Log ) ठेवतो. ती नोंद पाहून कुणीही त्या कॉम्प्युटरवर काय काम केले हे सांगू शकतो.

म्हणून तुम्हाला जर तुम्ही केलेल्या कामाची नोंद इतरांपासून लपवायची असेल तर त्यासाठी खाली काही पर्याय दिले आहेत. पण एक लक्ष्यात असू द्या ते म्हणजे, असे कुठलेही कुलुप नाही ज्याला किल्ली नाही त्याच प्रमाणे तुम्ही कितीही लपविण्याचा प्रयत्न केलात तरी एखादी (तुमच्याही पेक्षा) हुशार व्यक्ती ते शोधून काढू शकते.

१. विंडोज मध्ये पुरावे कसे मिटवाल?

:- १) तुम्हाला जर तुमची एखादी अति महत्वाची फाईल नष्ट ( डिलिट ) करायची असल्यास तीचे नाव बदलून ( तेही कॉम्प्युटरमधल्या एखाद्या फाईलीचे नाव वाटेल असे. ) उदा. ' Setup किंवा Winhelp ' असे देवून त्या फाईलीला डिलिट करा. तसेच ती फाईल रिसायकल बिन मधून देखिल डिलिट करायला विसरु नका.

:- २) तुम्ही केलेल्या किंवा उघडलेल्या फाईलीचे नाव विंडोजमधिल ' Start >> Documents ' मध्ये जमा होते. त्यासाठी ' Start >> Documents ' वर माऊस न्या बाजूला येणार्‍या यादीमध्ये आपण उघडलेल्या फाईलीचे नाव दिसेल, त्यावर माऊसने राईट क्लिक करुन ' Delete ' ह्या बटणावर क्लिक करा.

२. एखाद्या सॉफ्टवेअर मधिल पुरावे कसे मिटवाल?

:- १) एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये उदा. वर्ड, एक्सेल, फोटोशॉप अथवा ड्रिमव्हिवर मध्ये जर तुम्ही एखादी फाईल उघडलीत तर त्याच सॉफ्टवेअरमध्ये बटणांच्या वरील मेनूबारमधिल ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये शेवटी उघडलेल्या काही फाईलींची नोंद दिसेल, त्यात तुम्ही उघडलेल्या फाईलींची देखिल नोंद असेल, इथे फक्त आपल्याच फाईलींची नोंद मिटविणे शक्य नाही त्यासाठी त्या ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली दिसणार्‍या त्या सर्व फाईल्स पून्हा त्याच क्रमाने उघडाव्यात परंतू शेवटी आपली फाईल उघडण्या एवजी दुसरीच एखादी नको असलेली फाईल उघडावी, जेणे करुन आपल्या फाईलींची नोंद तेथून नाहीशी व्हावी आणि त्याएवजी त्या शेवटी उघडलेल्या फाईल येईल.

३. इंटरनेट एक्सप्लोरर मधिल पुरावे कसे मिटवाल?

आपणास माहीत आहेच की इंटरनेट एक्सप्लोरर हे एखादी वेबसाईट पाहाण्यासाठी वापरले जाते, जसे आपण आता त्याच सॉफ्टवेअरमध्ये ( ब्राऊझरमध्ये ) ही सहजच.कॉम वेबसाईट पाहत आहात. इंटरनेट एक्सप्लोररच नव्हे तर कुठल्याही ब्राऊझरमध्ये पाहिलेली कुठलीही वेबसाईट त्याचा ' History ' आणि ' Address Bar ' मध्ये साठविली जाते.

इंटरनेट एक्सप्लोररमध्ये आपण पाहिलेल्या वेबसाईट नोंद मिटविण्यासाठी खालिल क्रिया करा.

बटणांच्या वरील मेनूबार मधिल ' Tools ' या विभागातील ' Internet Options... ' या उपविभागावर क्लिक करा.


आता समोर येणार्‍या चौकोनात ' Delete Cookies... ' ह्या बटणावर क्लिक करा, त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' OK ' वर क्लिक करा.




टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट/फाईलींची नोंद कॉम्प्युटर ' Temporary Internet Files folder ' नावाच्या एका फोल्डर मध्ये ठेवतो त्यालाच ' Cookies ' असे म्हणतात, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.


आता परत त्याच चौकोनातील ' Delete Files... ' वर क्लिक करा. त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' Delete all offline content ' पुढील चौकोनावर क्लिक करुन ' OK ' वर क्लिक करा.




टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट वरील जास्त वेळ पाहीलेली चित्रे कॉम्प्युटर एका लपविलेल्या ' Temp ' या फोल्डरमध्ये साठवितो, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.

आता परत त्याच चौकोनातील ' Clear History ' या बटणाच्या बाजूला ' 20 ' असे लिहिलेले आढळेल, याचा अर्थ कॉम्प्युटर मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद त्याच्या ' Address Bar ' मध्ये साठवितो. तिथे त्या ' Clear History ' ह्या बटणावर क्लिक करुन ' OK ' वर क्लिक करा. परंतू यामूळे ' Address Bar ' मधिल सर्व वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होईल, असे केल्याने कॉम्प्युटर काहिही नुकसान होत नाही फक्त वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होते.




टिप : इंटरनेट एक्सप्लोररमध्ये मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद इथे असते, जर आपण ते बदलून १ दिवस केल्यास प्रत्येक दिवसानंतर त्या दिवशी पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद आपोआप नाहिशी होईल.


वर सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट लक्ष्यात असू द्या तुम्ही पुरावा कितीही लपविण्याचा प्रयत्न केलात तरी तुमच्या पेक्ष्या हुशार माणूस तुम्हाला शोधू शकतो.

Monday 26 September 2011

कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स










सर्वसामान्य शॉर्टकट्स
* CTRL+C : कॉपी

* CTRL+X : कट

* CTRL+V : पेस्ट

* CTRL+Z : अनडू

* DELETE : डिलिट

* SHIFT+DELETE : एखादी फाईल कायमची डिलिट करण्यासाठी

* F2 key : रिनेम : फाईलचे नाव बदलण्यासाठी

* SHIFT : एकापेक्षा जास्त गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी

* CTRL+A : सिलेक्ट ऑल : सर्व सिलेक्ट करण्यासाठी

* F3 key : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

* ALT+F4 : चालू प्रोग्राम बंद करण्यासाठी

* CTRL+F4 : एखाद्या प्रोग्राममधिल चालू फाईल बंद करण्यासाठी

* ALT+TAB : चालू असलेल्या प्रोग्राममध्ये स्थलांतर करण्यासाठी

* ALT+ESC : प्रोग्रामांमध्ये उघडलेल्या क्रमाने स्थलांतर करण्यासाठी

* SHIFT+F10 : एखाद्या सिलेक्ट केलेल्या गोष्टीसाठी शॉर्टकट

* CTRL+ESC : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

* F10 : चालू प्रोग्रामचा मेनू बार उघडण्यासाठी

* F5 : चालू प्रोग्राम रिफ्रेश (अद्ययावत) करण्यासाठी

* ESC : चालू प्रोग्राममधिल एखादी घटना (कमांड) रद्द करण्यासाठी

* CTRL+SHIFT+ESC : टास्क मॅनेजर सुरु करण्यासाठी


कि-बोर्ड वरील विंडोज बटणातील शॉर्टकट्स

* Windows Logo : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

* Windows Logo + BREAK : 'System Properties' सुरु करण्यासाठी

* Windows Logo + D : डेस्कटॉपवर जाण्यासाठी

* Windows Logo + M : सर्व चालू प्रोग्राम मिनिमाईझ करण्यासाठी

* Windows Logo + E : 'My Computer' सुरु करण्यासाठी

* Windows Logo + F : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

* Windows Logo + F1 : विंडोज हेल्प सुरु करण्यासाठी

* Windows Logo + L : कि-बोर्ड लॉक करण्यासाठी

* Windows Logo + R : विंडोज रन सुरु करण्यासाठी

* Windows Logo + U : 'Utility Manager' सुरु करण्यासाठी


इतर वेगळी शॉर्टकट्स

* Right SHIFT आठ सेकंद दाबून धरल्यास : Switch FilterKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


* Left ALT+left SHIFT+PRINT SCREEN : Switch High Contrast चालू अथवा बंद करण्यासाठी


*Left ALT+left SHIFT+NUM LOCK : MouseKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


*SHIFT सलग पाच वेळा दाबल्यास : StickyKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


* NUM LOCK पाच सेकंद दाबून धरल्यास : ToggleKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


विंडोज एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स

* END : चालू प्रोग्रामच्या खाली जाण्यासाठी

* HOME : चालू प्रोग्रामच्या वर जाण्यासाठी

* NUM LOCK + Asterisk sign (*) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सर्व सबफोल्डर उघडण्यासाठी

* NUM LOCK + Plus sign (+) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सबफोल्डर बघण्यासाठी

* NUM LOCK + Minus sign (-) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी

* LEFT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला उघडण्यासाठी

* RIGHT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी


इंटरनेट एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स



* CTRL + B : 'Organize Favorites' चालू करण्यासाठी

* CTRL + E : 'Search bar' चालू करण्यासाठी

* CTRL + F : ' Find ' : शोधण्यासाठी

* CTRL + H : ' History ' : आधी पाहीलेल्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी

* CTRL + I : 'Favorites' आवडत्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी

* CTRL + L : नविन वेबसाईट उघडण्यासाठी

* CTRL + O : नविन वेबसाईट उघडण्यासाठी

* CTRL + N : नविन पानामध्ये चालू असलेली वेबसाईट पून्हा उघडण्यासाठी

* CTRL + P : प्रिंट करण्यासाठी

* CTRL + R : ' Refresh ' : चालू वेबसाईटचे पान अद्ययावत ( रिफ्रेश ) करण्यासाठी


टिप : नक्कीच तुम्हाला वर सांगितलेल्या काही गोष्टी कळल्या नसतील, पण तुम्ही वापरुत तर बघा. बहूतेक तुमच्या उपयोगाच्या असू शकतात.