Tuesday 4 October 2011

कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची कार्यक्षमता तपासा

साधारणपणे आपण प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लोड करतो. म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरमध्ये कुठलाही व्हायरस घुसून कॉम्प्युटर बिघडू नये यासाठी आपण चांगल्यातला चांगला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लोड करतो.

कुठलाही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर हा चांगलाच असतो तो आपआपल्यापरीने कॉम्प्युटरमधिल व्हायरस शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर जर वेळोवेळी अपडेट केल्यास तो चांगल्याप्रकारे काम करतो. असे असले तरी आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची कार्यक्षमता किती आहे हे आपणास माहित नसते. आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर एखादा व्हायरस लगेच शोधू शकतो का? हे पडताळण्यासाठी आपणच त्याती परीक्षा घेवूया. म्हणजेच एक खोटी व्हायरस सदृश फाईल बनवून ती फाईल कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर शोधतो का ते पहायचे. खरंतर ही फाईल व्हायरस नसुन अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला फसविण्यासाठी हा प्रयत्न आहे.

१. Start > Programs > Accessories मधिल Notepad प्रोग्राम सुरु करा.




२. आता आपल्यासमोर नोटपॅड प्रोग्राम सुरु होईल. त्यामध्ये खाली दिलेली ओळ कॉपी/पेस्ट करा.

X5O!P%@AP[4\PZX54(P^)7CC)7}$EICAR-STANDARD-ANTIVIRUS-TEST-FILE!$H+H*



३. आता इतर काहिही टाईप न करता ती फाईल virus.com नावाने कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.

४. आता आपल्या कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सुरु करुन कॉम्प्युटर स्कॅन करा. पहा जर ती फाईल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने दाखविली तर चांगलेच आहे. नाहीतर तुम्हीच विचार करा.

No comments:

Post a Comment