Tuesday 4 October 2011

कॉम्प्युटरवरील आपल्या कामाचे पुरावे कसे लपवाल !

बर्‍याच वेळा तुम्ही एखाद्या कॉम्प्युटरवर काम केल्यानंतर इतर कुणीही व्यक्ती इतकेच की तुम्हीसुद्धा त्या कॉम्प्युटरवर काय काम केले हे सांगू शकता. कारण कुणीही एखाद्या कॉम्प्युटरवर केलेल्या कामाची तो कॉम्प्युटर नोंद ( Log ) ठेवतो. ती नोंद पाहून कुणीही त्या कॉम्प्युटरवर काय काम केले हे सांगू शकतो.

म्हणून तुम्हाला जर तुम्ही केलेल्या कामाची नोंद इतरांपासून लपवायची असेल तर त्यासाठी खाली काही पर्याय दिले आहेत. पण एक लक्ष्यात असू द्या ते म्हणजे, असे कुठलेही कुलुप नाही ज्याला किल्ली नाही त्याच प्रमाणे तुम्ही कितीही लपविण्याचा प्रयत्न केलात तरी एखादी (तुमच्याही पेक्षा) हुशार व्यक्ती ते शोधून काढू शकते.

१. विंडोज मध्ये पुरावे कसे मिटवाल?

:- १) तुम्हाला जर तुमची एखादी अति महत्वाची फाईल नष्ट ( डिलिट ) करायची असल्यास तीचे नाव बदलून ( तेही कॉम्प्युटरमधल्या एखाद्या फाईलीचे नाव वाटेल असे. ) उदा. ' Setup किंवा Winhelp ' असे देवून त्या फाईलीला डिलिट करा. तसेच ती फाईल रिसायकल बिन मधून देखिल डिलिट करायला विसरु नका.

:- २) तुम्ही केलेल्या किंवा उघडलेल्या फाईलीचे नाव विंडोजमधिल ' Start >> Documents ' मध्ये जमा होते. त्यासाठी ' Start >> Documents ' वर माऊस न्या बाजूला येणार्‍या यादीमध्ये आपण उघडलेल्या फाईलीचे नाव दिसेल, त्यावर माऊसने राईट क्लिक करुन ' Delete ' ह्या बटणावर क्लिक करा.

२. एखाद्या सॉफ्टवेअर मधिल पुरावे कसे मिटवाल?

:- १) एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये उदा. वर्ड, एक्सेल, फोटोशॉप अथवा ड्रिमव्हिवर मध्ये जर तुम्ही एखादी फाईल उघडलीत तर त्याच सॉफ्टवेअरमध्ये बटणांच्या वरील मेनूबारमधिल ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये शेवटी उघडलेल्या काही फाईलींची नोंद दिसेल, त्यात तुम्ही उघडलेल्या फाईलींची देखिल नोंद असेल, इथे फक्त आपल्याच फाईलींची नोंद मिटविणे शक्य नाही त्यासाठी त्या ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली दिसणार्‍या त्या सर्व फाईल्स पून्हा त्याच क्रमाने उघडाव्यात परंतू शेवटी आपली फाईल उघडण्या एवजी दुसरीच एखादी नको असलेली फाईल उघडावी, जेणे करुन आपल्या फाईलींची नोंद तेथून नाहीशी व्हावी आणि त्याएवजी त्या शेवटी उघडलेल्या फाईल येईल.

३. इंटरनेट एक्सप्लोरर मधिल पुरावे कसे मिटवाल?

आपणास माहीत आहेच की इंटरनेट एक्सप्लोरर हे एखादी वेबसाईट पाहाण्यासाठी वापरले जाते, जसे आपण आता त्याच सॉफ्टवेअरमध्ये ( ब्राऊझरमध्ये ) ही सहजच.कॉम वेबसाईट पाहत आहात. इंटरनेट एक्सप्लोररच नव्हे तर कुठल्याही ब्राऊझरमध्ये पाहिलेली कुठलीही वेबसाईट त्याचा ' History ' आणि ' Address Bar ' मध्ये साठविली जाते.

इंटरनेट एक्सप्लोररमध्ये आपण पाहिलेल्या वेबसाईट नोंद मिटविण्यासाठी खालिल क्रिया करा.

बटणांच्या वरील मेनूबार मधिल ' Tools ' या विभागातील ' Internet Options... ' या उपविभागावर क्लिक करा.


आता समोर येणार्‍या चौकोनात ' Delete Cookies... ' ह्या बटणावर क्लिक करा, त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' OK ' वर क्लिक करा.




टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट/फाईलींची नोंद कॉम्प्युटर ' Temporary Internet Files folder ' नावाच्या एका फोल्डर मध्ये ठेवतो त्यालाच ' Cookies ' असे म्हणतात, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.


आता परत त्याच चौकोनातील ' Delete Files... ' वर क्लिक करा. त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' Delete all offline content ' पुढील चौकोनावर क्लिक करुन ' OK ' वर क्लिक करा.




टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट वरील जास्त वेळ पाहीलेली चित्रे कॉम्प्युटर एका लपविलेल्या ' Temp ' या फोल्डरमध्ये साठवितो, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.

आता परत त्याच चौकोनातील ' Clear History ' या बटणाच्या बाजूला ' 20 ' असे लिहिलेले आढळेल, याचा अर्थ कॉम्प्युटर मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद त्याच्या ' Address Bar ' मध्ये साठवितो. तिथे त्या ' Clear History ' ह्या बटणावर क्लिक करुन ' OK ' वर क्लिक करा. परंतू यामूळे ' Address Bar ' मधिल सर्व वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होईल, असे केल्याने कॉम्प्युटर काहिही नुकसान होत नाही फक्त वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होते.




टिप : इंटरनेट एक्सप्लोररमध्ये मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद इथे असते, जर आपण ते बदलून १ दिवस केल्यास प्रत्येक दिवसानंतर त्या दिवशी पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद आपोआप नाहिशी होईल.


वर सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट लक्ष्यात असू द्या तुम्ही पुरावा कितीही लपविण्याचा प्रयत्न केलात तरी तुमच्या पेक्ष्या हुशार माणूस तुम्हाला शोधू शकतो.

No comments:

Post a Comment