Monday 26 September 2011

नेटवर्कचे प्रकार

भौगोलिक क्षेत्रानुसार संगणकाच्या नेटवर्कचे दोन प्रकार आहेत -
1) लोकल एरिया नेटवर्क (लॅन)
2) वाईड एरिया नेटवर्क (वॅन)
एका खोलीमधील, किंवा एका इमारती मधील खोल्यामधील किंवा एका ठिकाणच्या बिल्डींगमधील संगणकांना जोडणाऱ्या नेटवर्कला लोकल एरिया नेटवर्क (लॅन) म्हणतात. लॅनद्वारे डेटा ट्रान्समिशन चा वेग कित्येक मेगाबाईट प्रति सेकंद (106 बिट / सेकंद) इतका असतो. ट्रान्समिशनसाठी कोऍक्शिअल केबल वापरल्या जातात.
माहिती सामायिकपणे वापरण्यासाठी लॅनद्वारे, एका भागातले संगणक म्हणजेच सॉफ्टवेअर व हार्डवेअर जोडले जातात. सहसा मर्यादित भौगोलिक क्षेत्रातील संगणक लॅनद्वारे जोडले जातात कारण त्यांना जोडणाऱ्या केबल खूप महाग असतात. एका संगणकाच्या तुलनेत लॅनद्वारे जोडलेल्या संगणकांना अधिक चांगल्या डेटा-प्रोसेसिंग, वर्ड-प्रोसेसिंग आणि इतर माहितीची देवघेव करण्याची क्षमता मिळते. हयामुळे बहुतेक बिझनेस व सरकारी कार्यालयात लॅनचा वापर करण्यात येतो.
1) नेटवर्कमधील प्रत्येक संगणक इतर संगणकाबरोबर संपर्क करू शकतो.
2) संगणकाचे उच्च दर्जाचे कनेक्शन
3) संगणक एकमेकांना जोडणे सोपेअसते.
4) डेटा ट्रान्समिशनसाठी तुलनेनी कमी खर्चिक माध्यम.
5) वेगवान डेटा ट्रान्समिशन
1) एखादा संगणक बंद पडल्यास 8 नेटवर्कमधील इतर संगणकांचे काम थांबत नसल्याने अधिक विश्सार्हता
2) नेटवर्कमधे नवा संगणक जोडणे शक्य व सोपे.
3) वेगवान डेटा ट्रान्समिशन शक्य असते.
4) रिमोट डेटाबेस हँडलिंग
5) पर्सनल कॉम्प्युटिंग
6) डिजीटल व्हॉईस ट्रान्समिशन व स्टोरेज.
भौगोलिक क्षेत्रापुरते, किंवा देशांतर्गत किंवा जागतिक स्तरावर संगणकांना जोडणाऱ्या नेटवर्कला वाईड एरिया नेटवर्क म्हणतात. उदा: एका कंपनीचे मुख्य ऑफीस दिल्लीत असेल व मुंबई, मद्रास, बंगलोर आणि कोलकाता येथे शाखा आहेत. इथे प्रत्येक शाखेतील संगणक मुख्य ऑफिसशी वॅनद्वारे जोडले जातात. जोडल्या जाणाऱ्या संगणकामधील अंतर इथे जास्त असते. म्हणून डेटा ट्रान्समिशनसाठी टेलिफोन लाईन, मायक्रोवेब व सॅटेलाईट लिंकचा वापर केला जातो.

देशाच्या विविध भागात विस्तार असलेल्या कंपनीत दूर अंतराचे टेलिफोनचे बील कमी करता येते व दूर देशीचा वेळेचा फरकही जाणवत नाही. संगणकाद्वारे कॉन्फरन्सिंग करता येते, रिमोट डेटा एन्ट्री वॅनच्या माध्यमातून करता येते. नेटवर्क वरच्या कुठल्याही ठिकाणाहून डेटाएन्ट्री करता येते, त्यात कदल करता येतो, इतर संगणकाकडे प्रश्न पाठवून उत्तर मिळवता येते.
सध्याच्या संगणक युगात मोठया संस्था एककेद्रित डेटा स्टोरेज पध्दती पसंत करतात. संस्था जरी अनेक शहरांत विस्तारलेली असली तरी, महत्वाचा डेटामात्र कुठल्यातरी एकाच शहरात स्टोअर करतात. डेटा अनेक ठिकाणी तयार होत असल्याने तो एकत्र करूनएकाच ठिकाणी स्टोअर करण्याची सोय वॅन मधे असते.

No comments:

Post a Comment